भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून राज्यात टीकेची झोड उठली आहे. विरोधक आक्रमक झाले असून आंदोलन केले जात आहेत. पुण्यात ‘आप’कडूनही चंद्रकांत पाटलांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. पुण्यातील आपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पाटलांना शालेय साहित्य पोस्टाने पाठवले आहे. त्यामध्ये वही, पेन, पेन्सिल, रबर आणि तेलाची बॉटल आणि पोस्ट ऑफिसच्या बाहेरील येणार्‍या जाणार्‍या नागरिकांकडून गोळा केलेले पैसै आहेत.

हेही वाचा- पुण्यात बेकायदा बाइक टॅक्सी वाहतुकीविरोधात रिक्षाचालक आक्रमक; आरटीओ कार्यालयाबाहेर रिक्षा चालकांचे ठिय्या आंदोलन

thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

यावेळी सीमा गुट्टे म्हणाल्या की, भाजपा नेत्यांकडून सतत महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केली जात आहे. त्या नेत्यांविरोधात भाजपा नेतृत्वाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. त्यांना पाठीशी घातले जात आहे. ज्या महापुरुषांनी शिक्षणाची दार आपल्यासाठी खुली केली. त्यांच्याबद्दल तीन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी विधान केले आहे.त्या विधानाचा आम्ही निषेध व्यक्त करतो.त्या पार्श्वभूमीवर आम्ही चंद्रकांत पाटील यांना वही, पेन, पेन्सिल, रबर पाठवत आहोत. त्यांनी अभ्यास करून बोलल पाहिजे. यासाठी हे शालेय साहित्य पाठवत आहे. तसेच त्यांचे डोक शांत राहावे, या करिता तेलाची बॉटल त्यांना पाठवत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- चंद्रकांत पाटलांवरील शाईफेक: आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; तिघांना अटक, ११ पोलीस निलंबित

चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी सायंकाळी चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली. पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. या पार्श्वभूमीवर हा शाईफेकीचा प्रकार घडला. पाटील हे चिंचवड गाव येथे मोरया देवस्थानच्या कार्यक्रमासाठी आले होते. या ठिकाणी एका व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शुक्रवारी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. यानंतर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अठक केली आहे. दरम्यान पोलीस संरक्षणात असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ११ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.