मानसोपचार तज्ज्ञाचा ग्रामस्थांना मदतीचा हात

पुणे : कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या नागरिकांना त्या धक्क्यातून सावरणे ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असते. चिपळूणमध्ये येऊन गेलेल्या महापुरानंतर अनेकांनी डोक्यावरचे छप्पर, जीवलग गमावले आहेत. अनेकांचे प्रचंड आर्थिक नुकसानही झाले आहे. त्यातून सावरण्यासाठी स्वत:चे वैयक्तिक नुकसान बाजूला ठेवत पुण्यातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निके त कासार यांनी मदतीचा हात पुढे के ला आहे.

चिपळूणमध्ये येऊन गेलेल्या पुरानंतर तेथील वैद्यकीय व्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले आहे. रुग्णालये, दवाखाने यांमध्ये पाणी भरले आहे. महागडय़ा वैद्यकीय उपकरणांमध्ये चिखल गेल्याने ती निरुपयोगी झाली आहेत. तशातच पुराचे पाणी, चिखल यांमुळे रोगराई सुरू झाली आहे. साफसफाई, चिखलगाळ उपसण्याचे काम सुरू करून शक्य तिथे रुग्ण तपासणे, त्यांना औषधोपचार देणे डॉक्टर आणि रुग्णालयांनी सुरू के ले आहे. त्याचवेळी डॉ. कासार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या आपत्तीचा सामना करणाऱ्या नागरिकांना समुपदेशनासाठी मदत क्रमांक सुरू के ला आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!

डॉ. कासार म्हणाले, माझे मूळ गाव चिपळूणजवळील खेरडी आहे. मानसोपचारतज्ज्ञ म्हणून पुण्यात कार्यरत असलो तरी २००५ पासून महिन्यातून दोनदा मी चिपळूणमध्ये रुग्णसेवेसाठी येतो. एवढय़ा वर्षांतील सर्व रुग्णांच्या नोंदी, माहिती पुरात भिजून गेली आहे. या कागदपत्रांचे माहितीमूल्य प्रचंड होते. मेडिको-लीगल दाव्यांसाठी तसेच संशोधनासाठी या कागदपत्रांचा मोठा उपयोग होणार होता. मात्र, आता ते सगळे हातून गेले आहे. पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीतून सावरणाऱ्या नागरिकांना, मोठय़ा प्रमाणात मृत्यू डोळ्यांनी पाहिलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही पुढचा काही काळ समुपदेशनाची गरज भासणार आहे. त्यादृष्टीने माईंड एड हेल्पलाइन सुरू के ली आहे. ८३९००२८३८३ या क्रमांकावर दुपारी दोन ते पाच या वेळेत नागरिक समुपदेशनासाठी संपर्क  साधू शकतात. हे समुपदेशन संपूर्ण मोफत असेल.