scorecardresearch

पुणे : एकतर्फी प्रेमातून माथेफिरुचा अल्पवयीन मुलीवर हातोड्याने हल्ला

छेडछाड केल्याने मुलीने माथेफिरुला जेलवारी घडवली होती

Pune 17 year old girl attacked with a hammer for one sided love

पुण्यात तळेगावमध्ये एकतर्फी प्रेमातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर हातोड्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीच्या डोक्यात हातोडीने घाव घालून गंभीर जखमी केले आहे. शिवम विनोद शेळके (२०) असे माथेफिरू तरुणाचे नाव आहे. शिवमने याआधाही जखमी झालेल्या मुलीची छेड काढली होती. त्यानंतर, तळेगाव पोलिसांनी शिवमवर कारवाई करत त्याला कारागृहात पाठवले. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिवमने रागाच्या भरात अल्पवयीन मुलीच्या डोक्यात हातोड्याने घाव घालून गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी माथेफिरू शिवमला तळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम आणि अल्पवयीन मुलगी एकमेकांना ओळखत होते. पण शिवम या ओळखीचा गैरफायदा घेत असल्याचे अल्पवयीन मुलीला समजले. त्यानंतर हे प्रकरण तळेगाव पोलिसांपर्यंत गेले. पोलिसांनी मुलीची तक्रार घेऊन शिवमविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी शिवमला बेड्या ठोकत अटक केली. शिवमला न्यायालयात हजर केलं असता त्याला तीन आठवड्यांची शिक्षा सुनावण्यात आली.

तीन आठवड्यासांठी शिवमची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. कारागृहातून सुटून आल्यानंतर शिवमचे पोलिसांनी समुपदेशनही केले होते. पोलिसांनी यापुढे अशी कोणतीही तक्रार येऊ न देण्याची समज शिवमला दिली होती. मात्र शिक्षेनंतरही शिवममध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही.

गुरुवारी अल्पवयीन मुलगी कोचिंग क्लासवरून घरी परतत असताना अचानक शिवमने तिच्या डोक्यात हातोड्याने ७ ते ८ घाव घातले. या हल्ल्यामध्ये अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली. त्यानंतर मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गंभीर जखमी असूनही उपचारानंतर मुलीचा जीव वाचला आहे. यानंतर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवमला पोलिसांनी अटक केली असून पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune 17 year old girl attacked with a hammer for one sided love abn 97 kjp

ताज्या बातम्या