चिखली कुदळवाडी येथे मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत भंगार मालाची २५ पेक्षा जास्त  दुकाने जळून खाक झाली असून अद्याप आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. अग्निशामक दलाचे जवान आटोकाट प्रयत्न करीत आहेत. कुदळवाडी येथील विसावा चौकातील भंगारमालाच्या एका दुकानाला रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आग लागली. तब्बल दहा ते अकरा एकर क्षेत्रात हा परिसर पसरला आहे. याठिकाणची बहुतांश दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. प्राथमिक अंदाजनुसार, या आगीमुळे एक कोटींपेक्षा जास्तची वित्तहानी झाली आहे.

प्लास्टिक व अन्य ज्वलनशील वस्तू असल्याने आग भडकली आणि आजूबाजूच्या दुकानांनीही पेट घेतला. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सर्व अग्निशामक बंब घटनास्थळी पोहचले, मात्र आगीने रौद्ररूप धारण केलेले असल्याने पुणे, देहूरोड, चाकण तसेच शहरातील खासगी कंपन्यांचे अग्निशामक बंबांना देखील पाचारण करण्यात आले. १५ बंब आणि टँकर यांच्या मदतीने अग्निशामक दलाने रात्रभर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आग कमी झाली असली तरी देखील अजूनही धुमसतच आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पसरले असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.या अगोदर देखील याच परिसरात अनेकदा आग लागलेली आहे.चिखली आणि कुदळवाडी मध्ये सर्व भंगारची दुकाने आहेत. त्यामुळे यापूर्वीही अनेकदा याठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई
pune car fire marathi news, pune tempo fire marathi news
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय