पुणे : जिल्ह्यात २९९ जणांना नव्याने करोना संसर्ग

रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील २९९ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले आहे.

पुणे : जिल्ह्यात २९९ जणांना नव्याने करोना संसर्ग
( संग्रहित छायचित्र )

रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील २९९ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले आहे. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. मात्र, बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

रविवारी दिवसभरात आढळलेल्या २९९ नवीन रुग्णांपैकी १६० रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रात आहेत. ७९ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात, तर ६० रुग्ण जिल्ह्याच्या उर्वरित भागात आढळले आहेत. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी विशेषत: जोखीम गटातील रुग्ण, सहव्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांनी तसेच लसीकरण न झालेल्या नागरिकांनी मुखपट्टी वापरासह सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रविवारी आढळलेल्या २९९ नव्या रुग्णांमुळे पुणे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णसंख्या १४ लाख ९० हजार ४६६ एवढी झाली आहे. जिल्ह्यातील २९२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या महिनाभरात देशातील इतर भागांप्रमाणेच पुणे शहर आणि जिल्ह्यातही करोना रुग्णांची संख्या वाढत गेलेली पाहायला मिळाली होती. मात्र त्यामध्ये काही दिवसांपासून घट होत आहे.

१६ रुग्णांचे जनुकीय क्रमनिर्धारण
राज्यातील १६ रुग्णांच्या जनुकीय क्रमनिर्धारण चाचणीचे अहवाल प्राप्त झाले असून तीन रुग्णांना बीए.४, बीए.५ आणि १६ रुग्णांना बीए.२.७५ चे निदान झाले आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात आले आहे. हे सगळे रुग्ण पुणे येथील असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कळवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune 299 new corona infections in the district pune print news amy

Next Story
पुणे : कात्रज चौकात उदय सामंत यांची जाहीर सभा ; पुन्हा संघर्षाची शक्यता?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी