पिंपरी-चिंचवडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय तरुणीवर कारमध्ये बलात्कार केल्याचं उघड झाले आहे. तसेच तरुणीची ८ लाखांची आर्थिक फसवणूक केली गेली आहे. या प्रकरणी आश्विक शुक्ला नावाच्या तरूणाविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आश्विक आणि पीडित तरुणीची ओळख लग्न जुळवण्याच्या वेबसाइटवरून झाली होती. तरुणी ही एका नामांकित कंपनीत मॅनेजर असून आरोपी आश्विक शुक्लाने सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ अग्रीकल्चर अँड फार्मर वेलफेअर येथे डेप्युटी डायरेक्टर म्हणून कार्यरत असल्याच पीडितेला सांगितलं होतं, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी आश्विकला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्याने आणखी महिला आणि तरुणीना फसवलं असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय पीडित तरुणीला विवाह करायचा असल्याने लग्न जुळवण्याच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केले होते. यावरच आरोपी आश्विकने रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर ते दोघे तीन दिवसांनी पिंपळे सौदागर परिसरात भेटले, असं तक्रारीत म्हटलं आहे. त्यांच्यात ओळख वाढत गेली. दोघे ही दररोज व्हॉटसऍप चॅटिंग करत आणि एकमेकांसोबत कार मधून फिरायचे. आरोपी आश्विकने “तू मला आवडतेस आपण लग्न करू” अस पीडितेला सांगितलं. ही बाब, पीडित तरुणीने घरच्यांना सांगितली. त्यानंतर पीडित तरुणी आणि आरोपी हे एकमेकांना जास्त भेटायला लागले. दरम्यान, आश्विकने पीडितेसोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करत शारीरिक संबंध ठेवण्यास बळजबरी केली. पण, आपण अगोदर लग्न करू मगच शारीरिक संबंध ठेवू यावर तरुणी ठाम होती. तिने तसं आरोपीला सांगितलं आणि संबंध ठेवण्यास नकार दिला. 

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
pune crime news, pune koyta gang marathi news, pune school boy koyta attack marathi news
पुणे : शाळकरी मुलावर कोयत्याने वार; अल्पवयीन मुलांसह साथीदारांवर गुन्हा
baramati mp supriya sule talk regarding anonymous letter on social media
निनावी पत्राबाबत माहिती नाही! सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?

दरम्यान, पीडित तरुणी आश्विक राहत असलेल्या ठिकाणी गेली. तिथे आश्विक हा त्याच्या मित्रासह होता. गप्पागोष्टी करत असताना आपण एक व्यवसाय करू असं पीडितेला आश्विकने सुचवलं. कस्टममधील आलेल्या वस्तू कमी किमतीत घेऊन त्यांच्या विक्रीचा व्यवसाय करू असं पीडित तरुणीला सांगितलं. त्यासाठी मी ३० लाख रुपयांची जुळवाजुळव केली असून १० लाख रुपये कमी पडत असल्याचे सांगत “तू मला मदत कर” असे आरोपीने सांगितले. तेव्हा, पीडितेने त्यास नाही असं स्पष्ट सांगितलं. मात्र, त्याने आपलं लग्न होणार असून भविष्यासाठी चांगलं असून आपलं आयुष्य सेट होईल असं सांगत विनवणी केली. त्यानंतर, पीडित तरुणीने आरोपीला ८ लाखांची मदत केली. त्यानंतर काही दिवसांनी १५- १६ सप्टेंबर २०२१ रोजी वाकड परिसरातील नामांकित हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत कार थांबवून पीडित तरुणीसोबत विरोध केला असता बळजबरीने बलात्कार केला, असं तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर आरोपीने तरुणीला भेटणे कमी केले. आईला कोविड झाला असून मध्य प्रदेश येथे गेल्याचं आश्विकने सांगितलं. तो पुण्यात आल्यानंतर भेटतो असं म्हणाला होता परंतु, त्यानंतर आरोपीचा मोबाईल नंबर बंद येत होता.

म्हणून, थेट पुण्यात राहत असलेल्या पत्त्यावर तरुणी पोहोचली. परंतु,तो तिथे राहत नसल्याचं समोर आलं. अश्विक आणि त्याचा मित्र अग्निहोत्र हे दोघे फ्लॅट सोडून गेल्याचं सांगितलं. स्वतः ची आर्थिक फसवणूक तर झालीच शिवाय लग्नाचे आमिष दाखवून आपला बलात्कार झाल्याचं समजताच तरुणी तणावात गेली होती. यातून सावरल्यानंतर तरुणीने वाकड पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार, आश्विकसह त्याच्या मित्राला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर हे करत आहेत.