पुणे : मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यास रावेत ते नऱ्हे या ३२ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा करण्यात आला आहे. त्यासाठी सहा हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून, दोन टप्प्यांत तो पूर्ण करण्यात येणार आहे. प्रकल्पाचा उद्देश मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ चा रावेत ते नऱ्हे हा मुंबई-सातारा काॅरिडाॅरमधील एक महत्त्वाचा भाग आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भागातील दाट शहरी भागातून जाणाऱ्या या काॅरिडाॅरमध्ये हिंजवडी आयटी पार्क, भोसरी एमआयडीसी आणि चाकण औद्योगिक क्षेत्राचा समावेश आहे.
रावेत ते नऱ्हे या पट्ट्यामध्ये मालवाहतूक तसेच लांब पल्ल्याच्या वाहतुकीमुळे मोठी कोंडी होत आहे. हा महामार्ग त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त कार्यरत असल्यामुळे प्रवासाला ४५ ते ६० मिनिटांचा विलंब होत असून वेग प्रतीतास वीस किलोमीटर पेक्षा कमी होत आहे. चौफुले, अपुरे सेवा रस्ते आणि पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येमुळे ही परिस्थिती सातत्याने बिघडत आहे. त्यामुळे रावेत ते नऱ्हे उन्नत काॅरिडाॅरचा उद्देश थेट वाहतूक आणि स्थानिक वाहतूक वेगळी करणे असा आहे.
प्रकल्पाचे फायदे
महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करणे
सुरक्षा आणि प्रवासाची विश्वसनीयता वाढविणे
सरासरी वेग ८० किलोमीटर प्रतितासाने वाढविणे
प्रवासाचा वेळ ३० ते ४० टक्क्यांनी कमी करणे
उन्नत कॉरिडॉरचे भाग :
भाग एक : सुतारवाडी ते रावेत (१५.८७ किलोमीटर)
हा प्रस्तावित उन्नत काॅरिडाॅर सुतारवाडी येथून सुरू होतो आणि पुणे-मुंबई महामार्गापर्यंत जातो. त्यामुळे पुणे-सातारा विभागात एक महत्त्वाचा भाग तयार होत असून, संरेखन (अलाईनमेंट) वेगाने विकसित होत असलेल्या पश्चिम काॅरिडाॅरमधून जात आहे. त्यामध्ये किवळे जंक्शन, रावेत गाव, समीर लाॅन, पवना नदी ओलांडणे, पुनावळे-ताथवडे (दत्तावाडी) विभाग, भुजबळ चौक आणि बालेवाडी क्रीडा संकुलापर्यंतच्या मुठा नदी काॅरिडाॅरचा समावेश आहे. पुनावळे आणि ताथवडे येथे उड्डाणपूल आणि स्थानिक रस्त्यांच्या जाळ्यामध्ये उन्नत काॅरिडाॅर प्रभावीपणे समाविष्ट करण्यासाठी बहुस्तरीय प्रणाली प्रस्तावित आहे.
भाग दोन : सुतारवाडी ते जांभूळवाडी (१६.४० किलोमीटर)
प्रस्तावित उन्नत काॅरिडाॅर जांभूळवाडी वायडक्ट येथे सुरू होतो आणि सुतारवाडीपर्यंत पोहोचतो. कात्रज जंक्शन, भारती विद्यापीठ, पद्मावती आणि वारजे सारख्या नागरी ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. यापैकी नवले पूल येथे उन्नत काॅरिडाॅर, उड्डाणपूल आणि स्थानिक रस्त्यांचा एकात्मिक विकास केला जाणार आहे.
एकूण खर्च : दोन्ही टप्प्यातील एकूण खर्च ६ हजार ५३ कोटी एवढा अपेक्षित आहे.
शिफारशी : रावेत-नऱ्हे पट्ट्यातील वाढते नागरीकरण, संमिश्र वाहतूक आणि अपुऱ्या क्षमतेच्या रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या बाजूला ‘हाय डेन्सिटी काॅरिडाॅर’ विकसित झाल्यामुळे आणि मर्यादित ‘राईट ऑफ वे’मुळे महामार्गाचा विस्तार करणे किंवा रुंदीकरण करणे शक्य नाही. उन्नत काॅरिडाॅरच्या पर्यायामुळे महामार्ग वाहतूक आणि स्थानिक वाहतूक वेगळी करणे शक्य होणार आहे.