scorecardresearch

पुणे : विभक्त होण्याच्या तयारीत असलेले ३४ दाम्पत्य महा लोकअदालतीत पुन्हा आले एकत्र

लोकअदालतीत कौटुंबिक वादाचे ३९ दावे निकाली काढण्यात आले

(प्रातिनिधिक छायाचित्र)

विभक्त होण्याच्या तयारीत असलेल्या ३४ दाम्पत्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय आज (शनिवार) कौटुंबिक न्यायालयात पार पडलेल्या महा लोकअदालतीत घेतला.

कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालत पार पडली. लोकअदालतीत कौटुंबिक वादाचे ३९ दावे निकाली काढण्यात आले. त्यापैकी तीन दावे ऑनलाइन पद्धतीने निकाली काढण्यात आले. ३६ दावे पक्षकारांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत निकाली काढण्यात आले. त्यापैकी ३४ दाम्पत्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

कौटुंबिक न्यायालयात सध्या एकत्र नांदणे आणि पोटगी मिळवण्यासाठी दाखल झालेल्या दाव्यांपैकी १४१८ दावे प्रलंबित आहेत. त्यापैकी १२१ दावे लोकअदालतीसमोर निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आले होते. प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे, न्यायाधीश हितेश गणात्रा, न्यायाधीश मनीषा काळे, न्यायाधीश निरंजन नाईकवाडे, न्यायाधीश राघवेंद्र अराध्ये, दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड. वैशाली चांदणे, उपाध्यक्ष अजय डोंगर आदींनी पॅनेल न्यायाधीश म्हणून काम पाहिले.

पॅनेल समुपदेशक म्हणून संगीता पांडे, संध्या चव्हाण, एस. एस. सूर्यवंशी, निलोफर लोखंडवाला, राणी दाते यांनी काम पाहिले. ॲड. मधुगीता सुखात्मे, ॲड. वंदना घोडेकर, ॲड. विजया खळदकर, ॲड. गुलाब गुंजाळ, ॲड. मीनाक्षी डिंबळे यांनी पॅनेल वकील म्हणून काम पाहिले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune 34 couples who were preparing for separation reunited in maha lok adalat pune print news msr

ताज्या बातम्या