पुणे : ‘मोक्का’ कारवाईनंतर फरार झालेल्या गुंडाला सापळा रचून पकडले

खुनाचा प्रयत्न, घरफोडी, लूट असे गुन्हे दाखल आहेत

man arrest
प्रतिनिधिक छायाचित्र

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यावन्ये (मोक्का) कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या गुंडाला येरवडा पोलिसांनी पकडले.

निखील उर्फ पप्या संजय साळवे (वय २३, रा. यशवंतनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. साळवे याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, घरफोडी, लूट असे गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी साळवे याच्यासह साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली होती. तेव्हा पासून साळवे पसार झाला होता. तो पोलिसांना गुंगारा देत होता.

तो येरवडा परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्याला पकडण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, भगवान गुरव, कैलास डुकरे, अमजद शेख आदींनी ही कारवाई केली. मोक्का कारवाईनंतर साळवे कोठे गेला होता तसेच त्याला कोणी आश्रय दिला होता, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune a gangster who escaped after the mocca operation was caught in a trap pune print news msr

Next Story
राज्यात पाणीपट्टीत वाढ
फोटो गॅलरी