पुणे : वाहन चोरीचा तपास करणाऱ्या पोलीस शिपायाचा चावा घेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना शुक्रवार पेठेतील नेहरू चौकात घडली. खंडू दिलीप चौधरी (वय २३, रा. निठूर, ता. निलंगा, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई समीर माळवदकर यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – होऊ दे चर्चा..! महायुतीचे श्रीरंग बारणे की महाविकास आघाडीच्या संजोग वाघेरेंच्या रॅलीत गर्दी?

हेही वाचा – प्रतिष्ठित कान चित्रपट महोत्सवात पुण्याच्या एफटीआयआयचा लघुपट

पोलीस शिपाई समीर माळवदकर फरासखाना पोलीस ठाण्याच्या तपास पथकात नियुक्तीस आहेत. फरासखाना पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्याअनुषंगाने माळवदकर आणि त्यांचे सहकारी तपास करत होते. पोलिसांच्या पथकाने आरोपी खंडू चौधरी याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करण्यात येत होती. त्यावेळी चौधरीने पोलिसांना धक्का दिला. पसार होण्याच्या तयारीत असलेल्या चौधरीला पोलीस शिपाई माळवदकर यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चौधरीने त्यांच्या हाताचा चावा घेतला. सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड तपास करत आहेत.