scorecardresearch

पुणे : भरधाव मोटारीची वानवडी परिसरात ज्येष्ठ दाम्पत्याला धडक; महिलेचा मृत्यू

या प्रकरणी मोटारचालक पोपट निवृत्ती मदने (वय ४०, रा. सुरक्षानगर, वैदुवाडी, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे.

भरधाव मोटारीने पादचारी ज्येष्ठ दाम्पत्याला धडक दिल्याची घटना वानवडीत घडली. अपघातात पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला असून पती जखमी झाले आहेत. या प्रकरणी मोटारचालकास अटक करण्यात आली. विश्वंभरी नरेंद्रसिंग नेगी (वय ६०, रा. तात्या टोपे सोसायटी, वानवडी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात नरेंद्रसिंग नेगी (वय ६३) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत नेगी यांचा मुलगा डॅा. पंकजसिंग नेगी (वय ३२) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मोटारचालक पोपट निवृत्ती मदने (वय ४०, रा. सुरक्षानगर, वैदुवाडी, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे.

नेगी दाम्पत्य सकाळी साडेसहाच्या सुमारास फिरायला निघाले होते. राज्य राखीव पोलीस दलाच्या परिसरातील अलंकार लॅानजवळ भरधाव मोटारीने नेगी दाम्पत्याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या नेगी दाम्पत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान विश्वंभरी यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या मोटारचालकाला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune a speeding car hits a senior citizen couple one dead print news asj

ताज्या बातम्या