पुणे : कर्वेनगरमध्ये ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावणाऱ्या चोरट्याला पकडले

सोनसाखळी हिसकावून पसार झालेल्या डोंगरे शाहू कॅालनीत थांबल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली.

पुणे : कर्वेनगरमध्ये ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावणाऱ्या चोरट्याला पकडले
संग्रहित छायाचित्र

कर्वेनगर भागात ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने पकडले. चोरट्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली. प्रवीण मधुकर डोंगरे (वय २३, रा. गल्ली क्रमांक ७, कर्वेनगर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. कर्वेनगरमधील गिरीजाशंकर सोसायटीत दुचाकीस्वार डोंगरेने ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकावून नेली होती.

सोनसाखळी हिसकावून पसार झालेल्या डोंगरे शाहू कॅालनीत थांबल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे. डोंगरेने मौजमजा करण्यासाठी सोनसाखळी हिसकावल्याची कबुली दिली.

खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक अभिजीत पाटील, विकास जाधव, नितीन कांबळे, गजानन सोनवलकर, राजेंद्र लांडगे आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune a thief who stole jewelery from an elderly woman was caught in karvenagar pune print news amy

Next Story
पुणे : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ब्ल्यू टूथ यंत्राचा वापर परीक्षार्थी अटकेत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी