महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महामंडळाच्या (म्हाडा) योजनेत घर मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेची ६० लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी सातारा परिसरातून एकास अटक करण्यात आली.

संतोष दत्तात्रय पवार ( वय ३२, रा. मेढा, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पवारने म्हाडाच्या योजनेत महिलेला घर मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. महिलेकडून १६ लाख रुपयांचे ४० तोळे सोन्याचे दागिने तसेच ४२ लाखांची रोकड त्याने घेतली होती. तसेच, महिलेला विवाहाचे आमिष दाखवून पवारने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास समाजमाध्यमावर छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकीही त्याने दिली होती.

Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Former MLA Narayanarao Gavankar withdraws from Akola Lok Sabha constituency
माजी आमदार नारायणराव गव्हाणकरांची माघार, अकोला भाजपमधील बंड…
sangli crime news, cloroform for md drugs marathi news
सांगली: तासगाव तालुक्यातील शेतात ११ लाखांचे द्रवरुप क्लोरोफार्म जप्त, एमडीसाठीचा कच्च्या मालाचा साठा
aam aadmi party protest kolhapur marathi news
ईडीच्या नावाने बोंब मारून कोल्हापुरात केजरीवालांच्या अटकेचा निषेध; आपची प्रतीकात्मक होळी

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पवारचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. पवारला त्याच्या गावातून अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी पवारला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील ॲड. वर्षाराणी जाधव यांनी केली. न्यायालयाने त्याला २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.