scorecardresearch

पुणे : एकतर्फी प्रेमातून पाठलाग करत तरुणीला चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी

हडपसर पोलिसांकडून तरूणास अटक

(संग्रहीत छायाचित्र)

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा पाठलाग करुन चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणास हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

अभिजीत साबळे (रा. शिंदे वस्ती, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अभिजीत साबळे हा संबंधित तरुणीचा पाठलाग करुन त्रास देत होता. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझ्या प्रेमाचा स्वीकार कर’, असे म्हणून त्याने तिला धमकावण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने तरुणीला अडवले आणि माझ्याशी बोलली नाहीस तर चेहऱ्यावर ॲसिड फेकून जीवे मारण्याची धमकी देखील दिली. असे फिर्यादीत नमूद आहे.

घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर अभिजीत साबळेला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune a youth was arrested for threatening to throw acid on a young woman pune print news msr

ताज्या बातम्या