पुण्यातून अबुधाबीला जाण्यासाठी जेट एअरवेजच्या वतीने रोजची थेट विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचे उद्घाटन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी शिरोळे म्हणाले,‘‘अबुधाबी हे संयुक्त अरब अमिरात येथील आंतरराष्ट्रीय आíथक केंद्र आहे. अत्यंत खराब परिस्थितीतून अबुधाबीने आंतरराष्ट्रीय आíथक केंद्र हा प्रेरणादायक प्रवास केला आहे. या आíथक केंद्रापर्यंत पुण्याहून थेट विमान सेवा सुरु झाल्यामुळे पुण्याचा संपर्क वाढणार आहे. पुण्याच्या व्यापारात मोठी वाढ होणार आहे. विमानतळाचे संचालक मनोज गांगल, भूषण पटवर्धन, मराठा चेंबरचे एस. के. जैन, आमदार जगदीश मुळीक आदी त्या वेळी उपस्थित होते.
अबुधाबीला जाणारे बोईंग ७३७ – ८००  सिरीजचे विमान रोज रात्री आठ वाजून २० मिनिटांनी पुण्यातून निघणार आहे. अबुधाबीहून पुण्यात पहाटे चार वाजता हे विमान येईल. विमानाची क्षमता १६८ प्रवाशांची (१५६ आर्थिक किफायतशीर गट, १२ व्यावसायिक गट) आहे.