विसर्जन मिरवणुकीत उच्चक्षमतेची ध्वनिवर्धक वापर करुन ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांची नोंद करण्यात आली असून अशा मंडळांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. कार्यकर्त्यांचा उत्साह, दोन वर्षांच्या खंडानंतर विसर्जन मिरवणुकीसाठी झालेल्या गर्दीमुळे विसर्जन मिरवणूक लांबली, असे गुप्ता यांनी नमूद केले. भवानी पेठेतील कासेवाडी येथील महाराष्ट्र तरुण मंडळ विसर्जन मिरवणुकीतील शेवटचे मंडळ ठरले. या मंडळाने शनिवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ‘श्रीं’चे विसर्जन केले.

हेही वाचा >>> पुणे : अनंत चतुर्थीदिवशी ३ लाखाहून अधिक मूर्तींचे विसर्जन ; ४ लाख ४३ हजार किलो निर्माल्याचे संकलन

Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील विसर्जन मिरवणुकीची सांगता शनिवारी (१० सप्टेंबर) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास झाली. त्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बंदोबस्त मागे घेतला आणि मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर सकाळपासून मध्यभागातील रस्ते टप्याटप्याने खुले करण्यात आले. बंदोबस्त मागे घेण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्त गुप्ता यांनी पत्रकारांशी संवाद साधला. करोना संसर्गामुळे दोन वर्ष विसर्जन मिरवणुकीची परंपरा खंडीत झाली होती. कार्यकर्त्यांचा उत्साह, भाविकांची अलोट गर्दीमुळे यंदा विसर्जन मिरवणूक लांबली. विसर्जन मिरवणूक २९ तास सुरु राहिली. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास कासेवाडीतील महाराष्ट्र तरुण मंडळाच्या ‘श्रीं’चे विसर्जन झाल्याची नोंद पोलिसांनी केली, असे गुप्ता यांनी नमूद केले.
विसर्जन मिरवणुकीत अनेक मंडळांनी ध्वनिवर्धकांचा वापर केला. उच्चक्षमेतेचे ध्वनिवर्धक, प्रखर प्रकाशझोत तसेच ढोल ताशा पथकांचा आवाज मर्यादेबाहेर होता. अनेक मंडळांनी ध्वनिप्रदूषणाबाबत दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांची नोंद करण्यात आली असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

हेही वाचा >>> लोणावळ्यात पारंपरिक उत्साहात विसर्जन मिरवणूक ; मिरवणुकीत पावसाची हजेरी

सलग ३६ तासांपेक्षा जास्त बंदोबस्त
विसर्जन मिरवणुकीसाठी गुरुवारी (८ सप्टेंबर) रात्रीपासून शहरातील वेगवेगळ्या भागात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सलग ३६ तासांपेक्षा जास्त वेळ शहरातील बंदोबस्त कायम होता. शनिवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास शेवटच्या मंडळाने विसर्जन केले. त्यानंतर बंदोबस्त मागे घेण्यात आला, असे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.

अनुभव कमी पडला
प्रत्यक्ष गर्दीचे नियोजन करणे अवघड असते. निर्बंधामुळे गेले दोन वर्ष मिरवणूक काढण्यात आली नव्हती. यंदा कार्यकर्त्यांचा उत्साह होता. भाविकांची अलोट गर्दी झाली होती. गर्दीचे नियोजन करण्यास पोलिसांचा अनुभव कमी पडला. बंदोबस्तात अनेक अधिकारी नवखे होते, असे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी नमूद केले.

दृष्टिक्षेपात विसर्जन मिरवणूक मानाच्या गणपतींचे विसर्जन

मानाचे गणपती मिरवणूक प्रारंभ वेळ मिरवणूक मार्ग मिरवणूक समारोप वेळ घाट

श्री कसबा गणपती मंडळ सकाळी १० वाजून २ मिनिटे लक्ष्मी रस्ता दुपारी ४ वाजून १५ मिनिटे नटेश्वर घाट

श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ सकाळी १० वाजून १९ मिनिटे लक्ष्मी रस्ता सायंकाळी ५ वाजून ३७ मिनिटे नटेश्वर घाट

श्री गुरुजी तालीम मंडळ सकाळी १० वाजून ४६ मिनिटे लक्ष्मी रस्ता सायंकाळी ७ वाजून २७ मिनिटे नटेश्वर घाट

श्री तुळशीबाग मंडळ दुपारी १ वाजून १७ मिनिटे लक्ष्मी रस्ता रात्री ८ वाजून १ मिनिटे पांचाळेश्वर घाट

श्री केसरी वाडा दुपारी १ वाजून ५० मिनिटे लक्ष्मी रस्ता रात्री ८ वाजून ४५ मिनिटे पांचाळेश्वर घाट


रात्रीचे मानाचे गणपती

मानाचे गणपती मिरवणूक प्रारंभ वेळ मिरवणूक मार्ग मिरवणूक समारोप वेळ घाट

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्र्स्ट पहाटे चार वाजून २० मिनिटे लक्ष्मी रस्ता सकाळी ९ वाजून ३५ मिनिटे पांचाळेश्वर घाट

अखिल मंडई मंडळ पहाटे चार वाजून १५ मिनिटे लक्ष्मी रस्ता सकाळी १० वाजून ३० मिनिटे पांचाळेश्वर घाट

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सकाळी ७ वाजून २० मिनिटे लक्ष्मी रस्ता सकाळी ११ वाजून २० मिनिटे पांचाळेश्वर घाट

मिरवणूक मार्गावरून मार्गस्थ झालेली मंडळे

विसर्जन मार्ग मंडळांची संख्या

लक्ष्मी रस्ता २९२

टिळक रस्ता १९७

कुमठेकर रस्ता ४८

केळकर रस्ता ७१

एकूण मंडळे ६०८


शहरातील एकूण सार्वजनिक मंडळे- दोन हजार २३५


गेल्या दहा वर्षांतील विसर्जन मिरवणुकीची वेळ

वर्ष वेळ

२००९ २५ तास ४५ मिनिटे

२०१० २७ तास २५ मिनिटे

२०११ २७ तास २० मिनिटे

२०१२ २८ तास ५० मिनिटे

२०१३ २७ तास २५ मिनिटे

२०१४ २९ तास १२ मिनिटे

२०१५ २८ तास २५ मिनिटे

२०१६ २८ तास ३० मिनिटे

२०१७ २८ तास ५ मिनिटे

२०१८ २६ तास २३६ मिनिटे

२०१९ २५ तास ३९ मिनिटे