पुणे : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे महापालिका आणि संवाद पुणे यांच्या वतीने शनिवारी (२१ फेब्रुवारी) बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन महापौर मंजूषा नागपुरे आणि उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. या संमेलनात शासकीय अधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतीला वाङ्मय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. बिरदेव डोणे, सोनल सोनकवडे, शुभम पाटील, सोनल सूर्यवंशी, प्रसाद चौघुले हे अधिकारी संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धा परीक्षेतील संधी आणि आव्हानांवर मार्गदर्शन करणार आहेत.

तेलंगणचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत संमेलनाध्यक्षपदी असून, महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम स्वागताध्यक्ष आहेत. तसेच ‘यशदा’चे महासंचालक निरंजनकुमार सुधांशू हे मुख्य संयोजक, तर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे संमेलनाचे सहसंयोजक असल्याची माहिती यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यशदाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, महापालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीच्या सचिव आशा उबाळे या वेळी उपस्थित होत्या.

गायकवाड म्हणाले, ‘साहित्य क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सत्रांचे आयोजन या संमेलनात करण्यात येणार आहे. त्यानिमित्त महाराष्ट्राबाहेरील आणि महाराष्ट्र शासनात काम करणाऱ्या विविध मराठी अधिकाऱ्यांचे अनुभव ऐकण्याची संधी मिळणार आहे. रविवारी (दि. २२) सायंकाळी पाच वाजता संमेलनाचा समारोप होणार आहे.’

पहिला दिवस – शनिवार

वेळ…विषय …सहभाग

दुपारी १२:००…… ‘शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य लेखनातील आव्हाने’ परिसंवाद…… भारत सासणे, आनंद पाटील, सुशील गायकवाड

दुपारी १:३०…… महाराष्ट्राबाहेरील महाराष्ट्रीयीन प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अनुभवकथन…… महेश भागवत, राजेश पाटील, ज्ञानेश्वर मुळे, विजय कुलांगे, कपिल शिरसाट, प्रतीक ठुबे, सुरेन्द्रकुमार मानकोसकर

दुपारी ३:००…… ‘शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाची भूमिका व आव्हाने’ …… शेखर गायकवाड यांची मुलाखत – संवाद : राजीव नंदकर

सायंकाळी ४:००…… ‘अभिजात मराठी भाषा व प्रशासन’ परिसंवाद …… लक्ष्मीकांत देशमुख, किरण कुलकर्णी, गजानन पाटील, आनंद भंडारी – संवाद : किरण केंद्रे

सायंकाळी ५:००……शासकीय अधिकाऱ्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन……

सायंकाळी ५:१५…… कविसंमेलन…… दिलीप पांढरपट्टे, वैशाली पतंगे, सतीश राऊत, लीना संखे, गणेश मरकड, मनिषा कुंभार, वैशाली राजमाने, मोनिका सिंग, विद्या पोळ, व्यंकटेश कल्याणकर, किरण धांडे

सायंकाळी ६:१५……‘मुर्गा’ लघुपट……. कथा : भारत सासणे, पटकथा : राजेश जोशी, दिग्दर्शक : किरण लद्दे

दुसरा दिवस – रविवार

वेळ……विषय……. सहभाग

सकाळी १०:००…… ‘स्पर्धा परीक्षा संधी, समस्या व आव्हाने’…… बिरदेव डोणे, सोनल सोनकवडे, शुभम पाटील, सोनल सूर्यवंशी, प्रसाद चौघुले

सकाळी ११:००…… ‘माझे वाचन आणि लेखन’…… विकास खारगे, श्रावण हार्डीकर, सुनील पाटील, पौर्णिमा गायकवाड, आबा महाजन, अंजली ढमाळ

दुपारी १२:००…… ‘प्रशासकीय अधिकारी व साहित्य निर्मिती’ परिसंवाद…… चंद्रकांत पुलकुंडवार, वैशाली पतंगे, अनुराधा ओक, सोनाली इरपळे-घुले, अंजली ढमाळ

दुपारी १.३०…… दैनंदिन प्रशासकीय कामकाजातील विनोद ……शेखर गायकवाड, नाथ राणे, सत्यशील गुर्जर, राजेंद्र भामरे

दुपारी २:३०…… ‘कृत्रिम बुद्धिमत्ता-साहित्य क्षेत्रातील आव्हाने’…… सुनील पाटील, मुकुंद नाडगौडा, विकास गरड

सायंकाळी ४:००…… ‘अधिकारी साहित्य संमेलनाची दिशा व भवितव्य’ शेखर गायकवाड, राजीव नंदकर, सचिन सानप

सायंकाळी ५:००…… समारोप समारंभ …. –