पुणे : पुण्याहून देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये आता वाढ झाली आहे. पुण्यातून दुबई आणि बँकॉकसाठी थेट विमानसेवा सुरू झाली आहे. यामुळे पुण्यातून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या आता चार झाली आहे. पुणे विमानतळाने हिवाळी वेळापत्रकात या नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे नियोजन केले होते. इंडिगो एअरलाइन्सने पुण्याहून बँकॉकसाठी थेट विमानसेवा सुरू केली आहे. याचबरोबर इंडिगोनेच पुणे ते दुबई थेट विमानसेवा सुरू केली आहे. यामुळे आता पुण्यातून सिंगापूर, दुबई आणि बँकॉकसाठी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली आहे. पुण्यातून दुबईसाठी दररोज विमानसेवा सुरू असेल. हे विमान पुण्यातून सायंकाळी ५.४० वाजता निघून दुबईला रात्री १०.१० वाजता पोहोचेल. दुबईतून हे विमान रात्री १२.१५ मिनिटांनी सुटेल. पुण्यातून बँकॉकसाठी आठवड्यातून तीन दिवस बुधवारी, शुक्रवारी आणि शनिवारी थेट विमानसेवा सुरू असेल. हे विमान पुण्यातून रात्री ११.१० वाजता सुटेल आणि ते बँकॉकवरून रात्री १ वाजून १५ मिनिटांनी सुटेल.

तीन आंतरराष्ट्रीय ठिकाणे

पुण्यातून आधी स्पाईसजेटकडून सिंगापूर आणि एअर इंडियाकडून (आधीची विस्तारा) दुबईसाठी थेट विमानसेवा सुरू होती. त्यात दुबईसाठी आणखी एक आणि बँकॉक विमानसेवेची भर पडली आहे. यामुळे पुणे तीन आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी हवाई मार्गाने थेट जोडले गेले आहे. याचवेळी पुणे विमानतळावरील आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या चारवर पोहोचली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : पिंपरी : मंत्रिपदासाठी अजित पवारांच्या आमदाराचं लॉबिंग; माजी नगरसेवकांची बैठक घेऊन आग्रही मागणी

विमानतळाच्या दर्जात सुधारणा

एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनलच्या वतीने सर्वेक्षण करून विमानतळ सेवा गुणवत्ता (एएसक्यू) निर्देशांक जाहीर केला जातो. जगभरातील ९५ देशांतील ४०० विमानतळांचे सर्वेक्षण यासाठी केले जाते. यात देशातील १४ विमानतळांचा समावेश आहे. यंदा जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील सर्वेक्षणाच्या आधारे पुणे विमानतळ या निर्देशांकात ७४ व्या स्थानी आले आहे. पुणे विमानतळाला ५ पैकी ४.८४ गुण मिळाले आहेत. त्याआधीच्या एप्रिल ते जून तिमाहीत पुणे विमानतळ ७६ व्या स्थानी होते आणि विमानतळाला ४.८१ गुण मिळाले होते. त्यामुळे विमानतळावरील प्रवासी सुविधांचा दर्जा सुधारल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : आता प्रश्न सोडवणुकीकडे लक्ष हवे

पुण्यातून दुबई आणि सिंगापूरसाठी थेट विमानसेवा सुरू झाली आहे. यामुळे पुणे आंतरराष्ट्रीय मार्गाने आणखी ठिकाणांशी जोडले गेले आहे. यातून व्यापार वाढण्यासोबत विकासही होईल.

मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री

Story img Loader