पिंपरी चिंचवड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीच्या आई- वडीलांशी फोन द्वारे संवाद साधला. संवाद साधत असताना अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘त्या’ भ**ना सोडणार नाही. असा राग व्यक्त करत सोन्यासारख्या मुलीला नांदवायच नव्हतं तर सासरी पाठवायचं. अजित पवारांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच आश्वासन दिलं आहे.

शुक्रवारी वैष्णवी हगवणे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर अवघ्या महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. त्यांची आज पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी वैष्णवीच्या आई- वडिलांशी फोनद्वारे संवाद साधला. तुमच्या मुलीनं प्रेम विवाह केला होतं का. तुम्ही तिला जाच होत असल्याचं सांगितलं असतं तर वेळीच लक्ष घातलं असतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. उलट मला कळाल्यानंतर त्या आरोपींना लवकरात लवकर बेड्या ठोका असं पोलिसांना सांगितलं. आरोपीला शोधण्यासाठी तीन टीम लावल्या होत्या, आणखी तीन टीम वाढवायला सांगितल्या आहेत. सगळी कलम लावण्यास सांगितले आहेत. त्या भ**ना सोडणार नाही. एकीकडे प्रेम विवाह करतात आणि दुसरीकडे असे वागतात हरामखोर आहेत. मी तुमच्यासोबत आहे. तुमच्या मुलीच्या बाजूने आहे. असा विश्वास यावेळी अजित पवारांनी व्यक्त केला आहे.