पुणे: नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; ट्रकची मालवाहू गाडीला धडक; सात जण जखमी | Pune Another accident near Navale Bridge pune print news amy 95 | Loksatta

पुणे: नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; ट्रकची मालवाहू गाडीला धडक; सात जण जखमी

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. बुधवारी पहाटे भरधाव ट्रकने मालवाहू गाडीला धडक दिली.

पुणे: नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; ट्रकची मालवाहू गाडीला धडक; सात जण जखमी
संग्रहित छायाचित्र

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. बुधवारी पहाटे भरधाव ट्रकने मालवाहू गाडीला धडक दिली. त्यामध्ये मालवाहू गाडी उलटून सात जण जखमी झाले. जखमींना ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला.बाह्यवळण मार्गावरुन मुंबईकडे निघालेल्या भरधाव ट्रकने बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मालवाहू गाडीला धडक दिली. त्यामध्ये गाडीचालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी उलटली. या दुर्घटनेत मालवाहू गाडीत बसलेले सात जण जखमी झाले.

हेही वाचा >>>पुणे: ‘आयएनएस विक्रांत’वर लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण्या सुरू – नौदलप्रमुख

अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त गाडी क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आली. त्यानंतर या भागातील वाहतूक सुरळीत झाली. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला.
माहवाहू गाडीचे चालक लक्ष्मण कोकरे कोल्हापूरहून मुंबईकडे निघाले होते. जखमींना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आठवडभरात बाह्यवळण मार्गावर नऊ अपघात झाले आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 22:51 IST
Next Story
पुणे: ‘आयएनएस विक्रांत’वर लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण्या सुरू – नौदलप्रमुख