महाराष्ट्राचे लाडके ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या अभिनय कारकिर्दीला सलाम म्हणून पत्र्या मारुती गणपती मंडळाने विशेष विसर्जन रथ तयार केला आहे. ‘अशोक मामांचा हास्यरथ’ असे नाव असलेला हा रथ अशोक सराफ यांच्या गाजलेल्या विनोदी भूमिका आणि संवादांच्या कटआऊटने सजवण्यात आला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> गणेशभक्तांचे आकर्षण असणाऱ्या पुण्याच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; मानाच्या गणपती विसर्जनाला विलंब

पुण्यातील गणपती मंडळांकडून गणेशोत्सवातील सजावट, देखाव्यांसह विसर्जन मिरवणुकीच्या रथांवरही विशेष मेहनत घेतली जाते. यंदा अशोक सराफ यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याच्या औचित्याने पत्र्या मारुती गणपती मंडळाने हास्यरथ तयार केला आहे. या रथाची संकल्पना कौस्तुभ निकम आणि अमित बडवे यांची आहे. अतिशय अनोखा असलेला हा रथ लक्ष वेधून घेत आहे. 

हेही वाचा >>> पुणे : ठाकरे सरकार असते तरीही उत्सव निर्बंधमुक्त झाला असता : अजित पवार

अशोक मामांचा हास्यरथ तयार करण्याविषयी अमित बडवे म्हणाले, की अशोक सराफ महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आहेत. गेली अनेक वर्षे यांनी आपल्या भूमिकांतून, विशेषतः विनोदी भूमिकांतून महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी नुकतीच वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीला सलाम म्हणून त्यांच्या गाजलेल्या विनोदी भूमिकांवर आधारित अशोक मामांचा हास्यरथ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune ashok saraf career is saluted by ganesha immersion chariot pune print news amy
First published on: 09-09-2022 at 18:11 IST