इंधन दरवाढीचा असाही फटका; पुण्यात ट्रकमधून चोरलं तब्बल २०० लीटर डिझेल

वेळीच पेट्रोल आणि डिझेलचे भाव आटोक्यात न आल्यास अशा घटनांमध्ये वाढ झाल्यास आश्चर्य वाटायला नको!

पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. याचमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून पेट्रोल किंवा डिझेल मोटारीत किंवा दुचाकीचा टाकायचं म्हटलं की शंभर वेळा विचार करावा लागत आहे. दरम्यान, याच दरवाढीमुळे पुण्याच्या बावधन परिसरात भर रस्त्यात उभा केलेल्या ट्रक मधून तब्बल २०० लिटर डिझेल अज्ञात व्यक्तीने चोरल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी ट्रक चालक राकेश विजयसिंग यांनी हिंजवडी पोलिसात तक्रार दिली आहे 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी शंभरी पार केली आहे. दरवाढीमुळे नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. दुसरीकडे ऐन दिवाळीच्या तोंडावर भाजीपाला देखील महाग झाल्याने प्रत्येक व्यक्तीला महागाईला तोंड द्यावं लागत आहे. अशातच पुण्याच्या बावधनमध्ये सर्व्हिस रस्त्यावर उभा केलेल्या ट्रक (MH-55 AD 3123) मधून डिझेल टाकीचे लॉक उघडून तब्बल 200 लिटर डिझेल अज्ञात व्यक्तीने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना बावधन परिसरात पहाटेच्या सुमारास घडली असून हिंजवडी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. याअगोदर दुचाकीमधील पेट्रोल चोरी व्हायचे, मात्र आता डिझेलचे दर हे गगनाला भिडल्याने ते देखील चोरी होत असल्याच्या घटना समोर आहेत. वेळीच पेट्रोल आणि डिझेलचे भाव आटोक्यात न आल्यास अशा घटनांमध्ये वाढ झाल्यास आश्चर्य वाटायला नको!

जाणून घ्या पुण्यातले आजचे इंधन दर!

पेट्रोल – ११३.२७ रुपये प्रति लीटर
पॉवर पेट्रोल – ११६.९५ रुपये प्रति लीटर
डिझेल – १०२.६२ रुपये प्रति लीटर
सीएनजी – ६२.१० रुपये

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pune bawdhan unknown stolen 200 litre petrol from truck vsk 98 kjp

ताज्या बातम्या