नवीन विद्यापीठ कायद्याविरोधात भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. सोमवारी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या बंगल्याच्या बाहेर भाजपा युवा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी सकाळी पाच वाजल्यापासून आंदोलन सुरु केलं होते. त्यानंतर आता पुण्यात भाजपा युवा मोर्चाकडून विद्यापीठ सुधारणा कायदा त्वरित मागे घ्या अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पुणे स्टेशन येथील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस बाहेरील रस्त्यावर पांढर्‍या रंगाने विद्यापीठ काळा कायदा मागे घ्या असे लिहून भाजपाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

भाजपाच्या युवती युवा मोर्चाच्या निवेदिता एकबोटे यांनी विद्यापीठ काळे विधेयक मागे घ्या असे लिहित निषेध नोंदवला. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार बैठका घेत असतात. त्यामुळे अजित पवारांनी याची दखल घ्यावी, यासाठी सर्किट हाऊस बाहेरील रस्त्यावर आंदोलन करण्यात आले.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Nagpur Bench of Bombay High Court, Dismisses PIL, Alleging Illegal Killing Tigress, Tigress Avani, tigeress avani Illegal Killing , supreme court, public interest litigation, marathi news, animal rights,
अवनी वाघीण मृत्यूप्रकरण : उच्च न्यायालय म्हणाले, ‘पुन्हा युक्तिवाद…’
youth beaten, love jihad
‘लव्ह जिहाद’चा आरोप करून तरुणाला मारहाण… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

“कोणाचीही संमती नसताना या नालायक महाविकास आघाडीने हे विधेयक संमत करुन घेतले. यामुळे विद्यार्थ्यांचे, पालकांचे अतिशय नुकसान होणार आहे. विद्यापिठांवर हे स्वतः अंकुश ठेवणार आहेत. अशा विधेयकाचा निषेध करण्यासाठी भाजयुमोकडून आंदोलन करण्यात येत आहे,” अशी प्रतिक्रिया निवेदिता एकबोटे यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विद्यापीठ सुधारणा विधेयक संमत केल्यामुळे राज्यात भाजपच्या युवा कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. याआधाही नवीन कायद्याच्या निषेधार्थ मंत्री उदय सामंत यांच्या बंगल्या बाहेर आज पहाटे भाजपाच्यावतीने रांगोळी काढून आंदोलन करण्यात आलं होतं.