पुणे : “ कोणाचीही संमती नसताना महाविकास आघाडीकडून विधेयक संमत”; भाजपाकडून नवीन विद्यापीठ कायद्याविरोधात आंदोलन

पुणे स्टेशन येथील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस बाहेरील रस्त्यावर पांढर्‍या रंगाने विद्यापीठ काळा कायदा मागे घ्या असे लिहून भाजपाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

BJP agitates against new university law

नवीन विद्यापीठ कायद्याविरोधात भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. सोमवारी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या बंगल्याच्या बाहेर भाजपा युवा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी सकाळी पाच वाजल्यापासून आंदोलन सुरु केलं होते. त्यानंतर आता पुण्यात भाजपा युवा मोर्चाकडून विद्यापीठ सुधारणा कायदा त्वरित मागे घ्या अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पुणे स्टेशन येथील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस बाहेरील रस्त्यावर पांढर्‍या रंगाने विद्यापीठ काळा कायदा मागे घ्या असे लिहून भाजपाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

भाजपाच्या युवती युवा मोर्चाच्या निवेदिता एकबोटे यांनी विद्यापीठ काळे विधेयक मागे घ्या असे लिहित निषेध नोंदवला. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार बैठका घेत असतात. त्यामुळे अजित पवारांनी याची दखल घ्यावी, यासाठी सर्किट हाऊस बाहेरील रस्त्यावर आंदोलन करण्यात आले.

“कोणाचीही संमती नसताना या नालायक महाविकास आघाडीने हे विधेयक संमत करुन घेतले. यामुळे विद्यार्थ्यांचे, पालकांचे अतिशय नुकसान होणार आहे. विद्यापिठांवर हे स्वतः अंकुश ठेवणार आहेत. अशा विधेयकाचा निषेध करण्यासाठी भाजयुमोकडून आंदोलन करण्यात येत आहे,” अशी प्रतिक्रिया निवेदिता एकबोटे यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विद्यापीठ सुधारणा विधेयक संमत केल्यामुळे राज्यात भाजपच्या युवा कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. याआधाही नवीन कायद्याच्या निषेधार्थ मंत्री उदय सामंत यांच्या बंगल्या बाहेर आज पहाटे भाजपाच्यावतीने रांगोळी काढून आंदोलन करण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune bjp agitates against new university law abn 97 svk

Next Story
“शरद पवारांचा पक्ष म्हणजे…” असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्त्युत्तर, म्हणाल्या…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी