पुणे : घरगुती गॅस सिलिंडरचा साठा करून त्याची बेकायदा विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार सिंहगड रस्ता पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्याकडून टेम्पोसह ६१ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.

विकास धोंडाप्पा आकळे (वय ३१, सध्या रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक, मूळ. रा. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आकळे याच्याविरुद्ध दोन महिन्यांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. सिंहगड रस्ता पोलिसांचे पथक वडगाव बुद्रुक भागात गस्त घालत होते. त्यावेळी एकाने बेकायदा सिलिंडरचा साठा करुन ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा लावला. त्यावेळी सिलिंडर ठेवलेला टेम्पो आढळून आला. पोलिसांनी आकळेला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने बेकायदा सिलिंडरचा साठा करुन ठेवल्याचे स्पष्ट झाले. त्याने सिलिंडर कोणाकडून आणले, तसेच त्याची विक्री कुठे केली? याबाबतचा तपास सिंहगड रस्ता पोलिसांकडून करण्यात येत आहे.

12 shops were broken into in one night amateur robbers managed to cover cameras
एका रात्रीत १२ दुकाने फोडली, शौकीन दरोडेखोरांनी कॅमेरे झाकून साधला डाव
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Commissioner Shekhar Singh orders closure of RO project in Pimpri pune news
अखेर पिंपरीतील ‘आरओ’ प्रकल्प बंद; आयुक्तांचा आदेश
truck vandalism by bikers in pune
दुचाकी नीट चालव म्हटल्याने ट्रकची तोडफोड
pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : अठ्ठावीस वर्षांच्या लढ्याला यश; ‘या’ प्रकरणी ‘सर्वोच्च’ निकाल
vasai virar gold loksatta news
वसई : पोलिसांच्या तपासावर सराफाचे प्रश्नचिन्ह, लुटीतील उर्वरित ६०० ग्रॅम सोने गेले कुठे?
Classification of funds Rs 80 crore earmarked for construction of drainage lines and sewage treatment plants
आयुक्तांनी फिरविला शब्द, ८० कोटी रुपयांच्या निधीचे वर्गीकरण
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘४६ कोटींची बिलं, अवैध राखेचे साठे, एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० हायवा’, सुरेश धस यांचे गंभीर आरोप

हेही वाचा – पुणे : पावसामुळे हापूसचा हंगाम सुरू होण्यास विलंब, मार्केट यार्डात हंगामपूर्व हापूसची पहिली पेटी दाखल

हेही वाचा – पिंपरी : भोसरी एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनीला भीषण आग

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर आणि पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader