पुणे : पुण्यातील हडपसर भागातील फुरसुंगी येथे पाण्याच्या टँकरमध्ये २५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कौशल्या मुकेश चव्हाण वय २५ असे मृत महिलेचे नाव आहे.

हेही वाचा – रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध आता कारवाई, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा

हेही वाचा – ‘टोइंग’च्या सरसकट भुर्दंडातून सुटका, कारवाईच्यावेळी वाहनचालक उपस्थित असल्यास केवळ ‘नो-पार्किंग’चा दंड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ असलेल्या एका घरी पाणी पोहोचवण्याकरिता (एमएच १२, डब्ल्यूजे १०९१) या क्रमांकाचा टँकर गेला होता. त्यावेळी पाईप पाण्याच्या टाकीत सोडण्यात आला. मात्र पाणी काही आले नाही. त्यावेळी वॉल्व्ह चेक करून देखील पाणी आले नाही. त्यानंतर पाईप काढून पाहिल्यावर आतून साडी आल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर चालकाने टँकरचे झाकण उघडून पाहिल्यावर आतमध्ये एक महिलेचा मृतदेह आढळून आला. त्या महिलेबाबत आसपासच्या पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार आली आहे का ? याबाबत चौकशी केल्यावर एक महिला घरात कोणालाही न सांगत निघून गेल्याची तक्रार कोंढवा पोलिसाकडे असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे मृत महिलेच्या पतीला चौकशीकरिता बोलवलं असून अधिक तपास सुरु आहे. हा खून आहे की आत्महत्या याबाबत स्पष्टपणे आता काहीही सांगता येत नसून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर ते स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती हडपसर पोलिसांनी दिली.