पुणे : वैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बंडगार्डन रस्त्यावरील रुबी हाॅल क्लिनीकसमोर घडली. तरुणाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पाेलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सूरज सुभाष शिरोळे (वय २६, रा. रेल्वे क्वार्टर, मारुती मंदिराजवळ, ताडीवाला रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अनिल रेड्डी, विपुल हिंगवले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत शिरोळे याने काेरेगाव पार्क पोलीस ठाम्यात फिर्याद दिली आहे. सूरज आणि त्याचा मित्र आकाश रविवारी दुपारी दीडच्या सुमारास बंडगार्डन रस्त्यावरुन निघाले होते. रुबी हाॅल क्लिनीकसमोर आरोपी अनिल रेड्डी आमि विपुल हिंगवले यांनी सूरज आणि त्याच्याबरोबर असलेला मित्र आकाशला अडवले. ‘आमच्याकडे रागाने का बघतो. तुला मस्ती आली आहे क?, ’ असे आरोपी त्याला म्हणाले. त्यानंतर आरोपींनी सूरज आणि आकाशला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.

Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी

हेही वाचा – कल्याणीनगर अपघात प्रकरण : आमदार सुनील टिंगरे यांनी पाठविलेल्या नोटीशीत ‘यांची’ही नावे !

आरोपींनी त्यांच्याकडील लोखंडी वस्तूने (फायटर) सूरजला मारहाण केली. सूरजचे डोके आणि चेहऱ्यावर कठीण वस्तूने मारहाण केली. त्यावेळी सूरजच्या मित्र आकाशने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी आकाशला मारहाण केली. मारहाण केली. मारहाणीत सूरज गंभीर जखमी झाला. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

हेही वाचा – पुणे : मोदींच्या सभेसाठी भाजपसह महायुतीसमोर ‘हे’ आव्हान! स. प महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी होणार सभा

नगर रस्ता भागात दोघांना बेदम मारहाण

नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात दोघांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली. सौरभ संतोष तांबे (वय २४), अभिषेक सुधाकर मुजमुले (वय २३) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत तांबे (वय २४, रा. पिंपळे जगताप, ता. शिरुर) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तांबे, त्याचे मित्र मुजमुले, श्रीकांत आजबे बुलेटवरुन नगर रस्त्याने निघाले होते. त्यावेळी आरोपी ऋषीकेश रमेश झेंडे (वय २३, रा. साई बालाजी रेसीडन्सी, वाघोली) आणि तीन साथीदारांनी तांबेला अडवले. झेंडेने मुजमुले याच्या डोळ्यावर गज मारला. झेंडेबराेबर असलेल्या साथीदाराने तांबे याच्या हातावर गज मारुन जखमी झाले. झेंडे याला अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे तपास करत आहेत.