पुणे : सदाशिव पेठेतील एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून भरदिवसा घरफोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदनिका बंद करुन कामानिमित्त बाहेर गेलेली महिला परत घरी आली तेव्हा सदनिकेचे कुलूप तोडून चोरटा आत शिरल्याचे लक्षात आले. महिलेला पाहून चोरटे घाबरला आणि महिलेला धक्का देऊन पसार झाले. सुदैवाने या घटनेत महिलेला दुखापत झाली नाही. शहरात भरदिवसा घरफोडी करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सदाशिव पेठेतील एका सोसायटीत राहायला आहेत. ९ नोव्हेंबर राेजी त्या धनकवडीतील शंकर महाराज मठात दर्शनासाठी गेल्या होत्या. दुपारी दीडच्या सुमारास त्या मंदिरातून घरी आल्या. तेव्हा सदनिकेचे कुलूप तोडून चोरटे घरात शिरल्याचा प्रकार महिलेच्या लक्षात आला. महिलेने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महिलेला धक्का देऊन चोरटे पसार झाले. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून, पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे तपास करत आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – पुणेकरांनो मतदान करा अन् मोफत पेट्रोलसोबत बरंच काही मिळवा! विविध संघटनांकडून मतदान वाढविण्यासाठी पाऊल

दिवाळीनिमित्त अनेकजण सहकुटुंब बाहेरगावी फिरायला गेले. चोरट्यांनी सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करुन घरफोडीचे गुन्हे केले. दिवाळी झाल्यानंतर घरफोडीच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

हेही वाचा – खडकवासला मतदारसंघात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा, वारजे भागात विनापरवानगी सभेचे आयोजन

सदनिकेचे कुलूप तोडून पाच लाखांचा ऐवज चोरीला

सदनिकेचे कुलूप तोडून पाच लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना हडपसर परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अनंता पवार (वय ६२, रा. धारवाडकर काॅलनी, गोपाळपट्टी, मांजरी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवार कुटुंबीय दिवाळीनिमित्त गावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी चार लाख ८७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. पवार कुटुंबीय सोमवारी गावाहून परतले. तेव्हा सदनिकेचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

Story img Loader