pune by poll congress rebel leader balasaheb dabhekar file nomination form from kasba constituency zws 70 | Loksatta

पुणे : कसब्यात काँग्रेसमध्ये बंडखोरी; बाळासाहेब दाभेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते आणि आशिष महादळकर यांच्याकडे बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

पुणे : कसब्यात काँग्रेसमध्ये बंडखोरी; बाळासाहेब दाभेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

काँग्रेसमध्ये बंडखोरी करत बाळासाहेब दाभेकर यांनी मंगळवारी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी दाभेकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिरपासून अप्पा बळवंत चौक मार्गे दुचाकी फेरी काढण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते आणि आशिष महादळकर यांच्याकडे बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

हेही वाचा >>> चिंचवड पोटनिवडणूक: ” मला अजित पवार नाही, तर जनता आमदार करणार”; बंडखोर नेते राहुल कलाटेंनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

काँग्रेसचे ४० वर्षांपासून काम करत आहे. पोटनिवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून कार्यकर्त्यांच्या पाठबळावर पोटनिवडणुकीत विजयी होईन, असा विश्वास बाळासाहेब दाभेकर यांनी व्यक्त केला. दाभेकर यांनी बंडखोरी केल्याचा फटका काही प्रमाणात काँग्रेसला बसेल, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. दाभेकर अर्ज माघारी घेणार का, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 18:16 IST
Next Story
चिंचवड पोटनिवडणूक: ” मला अजित पवार नाही, तर जनता आमदार करणार”; बंडखोर नेते राहुल कलाटेंनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज