पुणे : शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीकडे भारतीय जनता पक्षाचे अवघे तीन आमदार उपस्थित राहिले. पुणेकरांच्या पाणीपुरवठ्याशी थेट संबंधित असलेल्या या बैठकीला शहरातील मंत्री आणि आमदारांनी बैठकीकडे पाठ फिरविल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा राजकीय चर्चेचा विषय ठरली.
जलसंपदामंत्र्यांसह विविध प्रमुख मंत्री, अधिकारी या बैठकीला उपस्थित असताना शहरामधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची आणि आमदार-खासदारांची अनुपस्थिती लक्ष वेधून घेणारी ठरली. शहरातील नागरिकांचे म्हणणे मांडण्यासाठी भाजपचे शहरातील आमदार भीमराव तापकीर, हेमंत रासने आणि सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह महापौर मंजूषा नागपुरे उपस्थित होत्या.
या बैठकीला जिल्ह्यातील अन्य आमदार उपस्थित असताना भाजपचे मंत्री आणि आमदारांची अनुपस्थितीची बैठकीत चर्चा सुरू झाली. यातील काही मंत्री शहराबाहेर बैठकीसाठी आहेत, त्यांनी ऑनलाइन लिंकही मागवून घेतली होती, कालवा सल्लागार समितीची बैठक ऐन वेळी निश्चित झाली असे सांगण्यात आले. मात्र, बैठकीची निमंत्रणे सर्व लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
