श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान शुक्रवारी (२४ जून) सकाळी होणार आहे. त्यामुळे आज (२३ जून) मध्यरात्री दोन पासून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.
पालखी सोहळ्यानिमित्त मध्यभागातील नाना-भवानी पेठेतील रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात आले आहेत.

वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
houses in Worli BDD
वरळी बीडीडीतील अंदाजे ५५० घरांचा ताबा वर्षाखेरीस, ३३ पैकी १२ इमारतींची कामे सुरु

श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिर येथून मार्गस्थ होणार आहे. पुलगेट, हडपसरमार्गे पालखी सोहळा सोलापूर रस्त्याने लोणी काळभोरकडे जाईल. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर येथून हडपसर गाडीतळ सासवड रस्ता येथून दिवे घाटमार्गे सासवडला मुक्कामी जाईल. सोलापूर, सासवड, नगरकडून मुंबईकडे येणाऱ्या तसेच जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील दिंड्यांबरोबर असलेल्या वाहनांनी कोंढवा, खडी मशीन चौक, बोपदेव घाटमार्गे सासवडकडे जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त शुक्रवारी बंद राहणारे रस्ते –

संत कबीर चौक ते बेलबाग चौक (लक्ष्मी रस्ता), संत कबीर चौक ते रामोशी गेट चौक, सेव्हन लव्हज चौक (ढोले पाटील चौक) ते रामोशी गेट चौक, गोळीबार मैदान ते सेव्हन लव्हज चौक, मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक, महात्मा गांधी रस्ता ते रामोशी गेट चौक, सोलापूर रस्त्यावरील मोरओढा ते भैरोबानाला चौक, भैरोबानाला ते मम्मादेवी चौक, बी. टी. कवडे रस्ता तसेच सोलापूर रस्ता रस्ता शुक्रवारी सकाळी वाहतुकीस बंद राहणार आहे.