पुणे : शहर परिसरात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) ५० गुन्हे दाखल झाले आहेत. जानेवारी ते मार्च महिन्यात विनयभंगाचे १४९ गुन्हे दाखल झाले आहे. बहुतांश गुन्ह्यातील आरोपी हे ओळखीतील आहे. ओळखीतील आरोपींनी अत्याचार, तसेच विनयभंगाचे गुन्हे केल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे.
नसरापूर, तसेच पर्वती पायथा परिसरात अत्याचारांच्या घटना घडल्या. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पोक्सो, तसेच विनयभंग प्रकरणातील गुन्ह्यांची माहिती दिली. २०२४ मध्ये बोपदेव घाटात एका महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार करण्यात आला होता. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती.
गेल्या वर्षी कोंढव्यातील एका सोसायटीत राहणाऱ्या तरुणीने सदनिकेत शिरून बलात्कार करण्यात आल्याची फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास केला. तेव्हा तरुणीने पोलिसांची दिशाभूल करून खोटी फिर्याद दिल्याचे तपासात उघडकीस आले होते. गेल्या वर्षी दाखल झालेल्या विनयभंग प्रकरणाच्या गुन्ह्यांमध्ये १२ ते १४ प्रकरणे गंभीर आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बलात्कार प्रकरण
२०२५ – २४० दाखल गुन्हे
२०२६ – ४९ दाखल गुन्हे
(२०२६ ची आकडेवारी जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंतची )
विनयभंग प्रकरण
वर्ष दाखल गुन्हे
२०२५ – ६१३ दाखल गुन्हे
२०२६ – १४० दाखल गुन्हे
(२०२६ ची आकडेवारी जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंतची )
बाल लैंगिक अत्याचार प्रकरण
२०२५ – २९९ दाखल गुन्हे
२०२६ – ५० दाखल गुन्हे
(२०२६ ची आकडेवारी जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंतची )
