पुणे : अमेरिका आणि इस्त्रालयने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने प्रत्युत्तरा दाखल अमेरिकेच्या दुबई येथील हवाई तळावरील केलेल्या हल्ल्यामुळे पुण्यातील दहा नागरिक आणि ८० विद्यार्थ्यांसह पाच शिक्षक दुबईत अडकले आहेत. या सर्वांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला असून सर्वजण सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

सुहानी चेतन देविदास‚ सिद्धेश्वर धनराज जाधव‚ रोहित हरी अल्हाट‚संदीप अशोक उकरंडे‚ गणेश सूर्यकांत गुळवे‚ अजय चंद्रशेखर काळे‚ प्रवीण मच्छिंद्र बंड‚ विशाल भरत भोसले आणि किशोर कुलकर्णी हे पुण्यातील नागरिक दुबईत अडकले आहेत. या सर्वांबरोबर जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने संपर्क साधला असून ते सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

दरम्यान ‚ पिंपरी-चिंचवड येथील इंदिरा महाविद्यालयाचे ऐंशी विद्यार्थी आणि पाच शिक्षकही दुबईत अडकले आहेत. हे विद्यार्थी आणि शिक्षक पंधरा दिवसांच्या कॉलेज  कॅम्पेन साठी गेले होते‚ असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.