पुणे : जिल्ह्यातील १८२ जणांना शुक्रवारी करोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या १४ लाख ५१ हजार ६०९ एवढी झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यातील दोन रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला. त्यामुळे करोना संसर्गाने मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या १९ हजार ६८१ एवढी झाली आहे.
पुणे जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ८ हजार ९०८ चाचण्या करण्यात आल्या, त्यांपैकी २ हजार ७९२ चाचण्या पुणे शहरात झाल्या. शहरात ४.२९ टक्के आणि जिल्ह्यात २.०४ टक्के संसर्गाचा दर नोंदवण्यात आला. दिवसभरात आढळलेल्या १८२ नवीन रुग्णांपैकी १२० रुग्ण पुणे शहरातील, तर २२ रुग्ण पिंपरी-चिंचवडमधील आहेत. उर्वरित ग्रामीण भागातील ४० रुग्णांना करोनाचा संसर्ग झाला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी एका रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला. पुणे शहरातील १९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे शहरातील करोनामुक्त रुग्णांची संख्या ६ लाख ५० हजार ७१५ झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील ६६ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.
पुणे – १२० नवे रुग्ण, एक मृत्यू
पिंपरी-चिंचवड – २२ नवे रुग्ण, एक मृत्यू
ग्रामीण भाग – ४० नवे रुग्ण, शून्य मृत्यू