महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरांच्या वतीने मंगळवारी (१३ डिसेंबर) पुणे बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने संविधानिक पदावर असलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील काही मंत्री इतिहासात नोंद नसलेल्या गोष्टींचा दाखला देऊन बदनामीकारक वक्तव्य करीत आहेत. याबाबत कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत केलेली नाही. पुणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांची कर्मभूमी आहे. पुणेकर म्हणून या राष्ट्रपुरुषांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. या वाचाळ वीरांना योग्य तो संदेश देण्यासाठी सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकर म्हणून मंगळवारी पुणे बंदचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे शरहप्रमुख गजानन थरकुडे यांनी दिली.

Hasan Mushriff on shahu maharaj
“महाराज अजूनही वेळ गेलेली नाही…”, हसन मुश्रीफ यांचा छत्रपती शाहूंना इशारा
Shahu Maharaj
शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार
With the blessings of Udayanaraj i got more strength says shivendrasinh raje
सातारा: महाराजांच्या आर्शिवादाने मला दहा हत्तीचे बळ- शिवेंद्रसिंहराजे
Udayanraje Delhi
शहांनी बडदास्त ठेवलेले उदयनराजे आता भेटीसाठीही तरसले!

हेही वाचा >>>“स्मशानभूमीत येईन, पण शहर कार्यालयात येणार नाही”, मनसेच्या वसंत मोरे यांनी ठणकावलं; म्हणाले “जिथे फुलं वेचली…”

मंगळवारी (१३ डिसेंबर) डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास सकाळी दहा वाजता पुष्पहार अर्पण करून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चा पुढे खंडुजीबाबा चौक, टिळक चौक – लक्ष्मी रोडने बेलबाग चौक आणि तेथून लाल महाल येथे पोहोचल्यानंतर सभेने समारोप होणार आहे. खासदार उदयनराजे भोसले, मराठा क्रांती मोर्चा, मुस्लिम संघटना, मागासवर्गीय संघटना, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, गणेश मंडळ, व्यापारी संघटना, शैक्षणिक संघटना, मराठा संघटना, मार्केटयार्ड मधील सर्व संघटना, रिक्षा संघटना, तालीम संघ, माथाडी कामगार संघ, वकील संघटना, क्रीडा संघटना, बँक असोसिएशन, कामगार युनियन, राजकीय पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट), शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, एम. आय. एम., जनता दल, वंचित बहुजन आघाडी त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संघटना मोर्चात सहभागी होणार आहेत.