scorecardresearch

नशा करणाऱ्या अल्पवयीन मुलांकडून तरुणावर हल्ला; तीन जण ताब्यात

नशा करताना हटकले म्हणून चिडलेल्या अल्पवयीन मुलांनी तरुणावर डूग धरुन हल्ला केला.

नशा करणाऱ्या अल्पवयीन मुलांकडून तरुणावर हल्ला; तीन जण ताब्यात
( संग्रहित छायचित्र )

नशा करताना हटकल्याने अल्पवयीन मुलांनी एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात घडली. या प्रकरणी पाच अल्पवयी मुलांच्या विरोधात सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा- मद्यपी मुलाकडून आईवर चाकूने हल्ला ; लोणी काळभोरच्या कदमवाक वस्तीमधील घटना

नशा करताना हटकले म्हणून हल्ला

आदेश सुरेश सोनवणे (वय ३०, रा. महादेवनगर, धायरी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत सोनवणे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुले सोनवणे यांच्या ओळखीची आहेत. ती नशा करत असल्याचे सोनवणे यांनी पाहिले होते. त्यांनी अल्पवयीन मुलांना हटकले होते. त्यामुळे अल्पवयीन मुले सोनवणे यांच्यावर चिडून होती. सोनवणे धायरी परिसरातून जात होते. त्या वेळी एका मुलाने काय रे दादा मला ओळखतो का? अशी विचारणा केली. अल्पवयीन मुलगा आणि साथीदारांनी सोनवणे यांच्यावर कोयत्याने वार केला. अल्पवयीन मुलांनी परिसरात दहशत माजविली. या प्रकरणी पोालिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या