पुणे शहरातील कोंढवा भागात बेकायदा पद्धतीने चालवल्या जात असलेल्या बनावट टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश करण्यात एटीएस विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. तर या प्रकरणी ३२ वर्षीय नौशाद अहमद सिद्धीकी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
एटीएस विभागाच्या अधिकाऱ्यांना सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कोंढवा परिसरातील मीठानगरमधील एम ए कॉम्प्लेक्समध्ये ३२ वर्षीय नौशाद अहमद सिद्धीकी हा तरुण बनावट टेलिफोन एक्स्चेंज सिम बॉक्सच्या साह्याने अनधिकृतपणे बनावट टेलिफोन एक्स्चेंजचे चालवित आहे आहे.अशी माहिती मिळाल्यानंतर मीठानगरमधील एम ए कॉम्प्लेक्समध्ये छापा टाकल्यावर घटनास्थळावरून विविध कंपन्याचे ७ सीम बॉक्स, ३ हजार ७८८ सीम कार्ड, ९ वायफाय राऊटर, मोबाइल, अँटिना आणि लॅपटॉप आढळून आले. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपी नौशाद अहमद सिद्धीकी यास ताब्यात घेण्यात आले असून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीकडे अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे समजते.
पुण्यातील कोंढव्यात एटीएसचा छापा, बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटरचा केला पर्दाफाश
पुणे शहरातील कोंढवा भागात बेकायदा पद्धतीने चालवल्या जात असलेल्या बनावट टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश करण्यात एटीएस विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 29-08-2024 at 15:35 IST | © IE Online Media Services (P) Ltd
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune crime ats busts fake telephone exchange center in kondhwa svk 88 zws