scorecardresearch

पुणे : बाणेर भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; गुन्हे शाखेचा छापा; तीन तरुणी ताब्यात

आरोपी पुष्पा शिंदेने महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ओढल्याचे तपासात उघडकीस आले आहे. 

पुणे : बाणेर भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; गुन्हे शाखेचा छापा; तीन तरुणी ताब्यात
सांकेतिक फोटो फोटो सौजन्य : लोकसत्ता

बाणेर भागात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागने उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणींना ताबात घेण्यात आले असून मसाज सेंटर चालविणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा >>>पुणे : एकतर्फी प्रेमातून युवतीवर ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी

याप्रकरणी मसाज सेंटर चालक पुष्पा केशव शिंदे (वय ३३, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी अण्णा माने यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बालेवाडी-बाणेर रस्त्यावरील गणराज चौकातील एका इमारतीत स्पंदन स्पा नावाच्या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. पोलिसांनी मसाज सेंटरवर छापा टाकून तीन तरुणींना ताब्यात घेतले. आरोपी पुष्पा शिंदेने महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ओढल्याचे तपासात उघडकीस आले आहे.  पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार आणि पथकाने ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 14:57 IST

संबंधित बातम्या