पुणे : पर्वती पायथा येथे भररस्त्यात १७ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून

रविवारी रात्री आठच्या सुमारास पर्वती पायथा येथे सहा जणांनी कोयत्याने सपासप वार करून १७ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची माहिती समोर आलीय

Police in Hospital, Pune, Pune Crime
पर्वती पायथा येथे हा प्रकार घडला, वार केल्यानंतर या आरोपींनी कोणीही या मुलाला मदत करु नये अशी धमकीही दिली. (प्रातिनिधिक फोटो)

पुण्यामधील पर्वती पायथा येथे रविवारी रात्री भररस्त्यात एका १७ वर्षीय आरोपीची पूर्ववैमनस्यातून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेगाव पठार येथे मागील महिन्यात एका तरुणाचा खून झाला होता. त्या गुन्ह्यातील १७ वर्षीय आरोपी जामीनावर आला होता. या आरोपी तरुणाचा काल (रविवार, १३ जून २०२१ रोजी) रात्रीच्या सुमारास पर्वती पायथा येथे सहा जणांनी कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची माहिती समोर आलीय.

सौरभ वाघमारे वय असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सौरभ वीर ऊर्फ मोन्या, अक्षय वीर, वृषभ दत्तात्रय रेणूसे, सचिन ऊर्फ दादा पवार, आकाश नावडे आणि स्वामी कांबळे या आरोपींनी सौरभ वाघमारेचा खून केला आहे.

नक्की वाचा >> पिंपरी चिंचवड : KYC च्या नावाखाली तरुणीचे दीड लाख लुटले; QR Code, Links च्या माध्यमातून फसवणुकीत वाढ

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती पायथा येथे काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सौरभ वाघमारे मोबाईल खरेदीसाठी गेला होता. त्यावेळी तिथे सौरभ वीर त्याचा सख्खा भाऊ अक्षय वीर आणि इतर चारजण दबा धरून बसले होते. सौरभ वाघमारेला पाहताच या सहा जणांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. सौरभ रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर हे आरोपी हातात कोयता घेऊन आसपास असलेल्या नागरिकांवर धावून जात, कोणी याला वाचविलं तर तुम्हाला देखील मारून टाकू, अशी धमकी देऊन घटनास्थळावरुन पळूनगेले. त्यानंतर सौरभ तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्याला मृत घोषित केले. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती दत्तवाडी पोलिसांनी दिलीय.

या घटनेतील मयत सौरभ वाघमारे हा आंबेगाव पठार येथे २१ एप्रिल रोजी संग्राम लेकावळे या तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपी होता. या खुनाच्या प्रकरणी सौरभ याला अटक करून बालसुधारगृहात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याची जामीनावर सुटका झाली होती. तो बाहेर आल्याचे आरोपींना समाजातच सहा जणांनी त्याचा खून केल्याची माहिती पुढे येत आहे. सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pune crime news 17 year old boy murdered by six svk 88 scsg