पिंपरीत महिलेचा व्हिडिओ घेऊन तृतीय पंथीच्या गाण्यावर केला डब; गुन्हा दाखल

महिलेला पाहून आरोपींनी टाळ्या वाजवत केले अश्लील हावभाव

Crime video
आरोपींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये काही टवाळखोरांनी महिलेची छेड काढत नकळत व्हिडिओ काढून त्याला तृतीयपंथीयांच्या गाण्यावर डब केल्याची विचित्र घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रेय गोळे, महेश आमराळे, शरीफ (पूर्ण नाव माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अद्याप ते फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

पिंपरीत काही टवाळखोरांनी एका महिलेचा नकळत व्हिडिओ घेऊन त्यासोबत छेडछाड करून तो तृतीपंथीयांच्या गाण्यावर डब केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेने तीन वर्षांपूर्वी आरोपी दत्तात्रेय गोळेला मोबाईल नंबर दिला नाही. याचा राग मनात धरून पीडित महिलेच्या नकळत त्यांचा व्हिडिओ मोबाईलमध्ये घेतला. व्हिडिओला तृतीय पंथीयांच्या गाण्यावर डब करून तो मित्रांना पाठवला. यामुळे महिलेची बदनामी झाली. तसेच, फिर्यादी महिलेला पाहून टाळ्या वाजवून अश्लील हावभाव केले, म्हणून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pune crime news accused make video of woman on transgenders song and make it viral vsk 98 kjp

ताज्या बातम्या