पुण्यातील शंकरशेठ रस्त्यावर अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तिघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून तीन लाख ८६ हजारांचे २५ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

हेही वाचा- दुचाकी चोरट्यांना पकडले ; सहा दुचाकी जप्त

तालीब शकील अन्सारी (वय २३,रा.घोरपडे वस्ती, लोणीकाळभोर), आयान अल्ताफ बागवान (वय १९), वसीम आसिम सय्यद (वय १९, दोघे रा. भाग्योदय नगर कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकरशेठ रस्त्यावर तिघे जण अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेणयात आली. तेव्हा त्यांच्याकडे मेफेड्रोन सापडले.

हेही वाचा- नवरात्रोत्सवात फलकावर छायाचित्र न लावल्याने एकाला मारहाण; चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

अतिरिक्त पाेलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, विशाल दळवी, मनोज साळुंके, पांडुरंग पवार, सचिन माळवे आदींनी ही कारवाई केली.