scorecardresearch

पुणे: “तू मोठी झालीयेस का हे पाहायचंय” असं सांगत बापाचा आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सहा महिन्यांनंतर ही बलात्काराची घटना उघडकीस आली आहे.

पुणे: “तू मोठी झालीयेस का हे पाहायचंय” असं सांगत बापाचा आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पिंपरी-चिंचवड शहरात वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ४५ वर्षीय वडिलाने ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नराधम बापाला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेप्रकरणी पीडित मुलीच्या आईने वाकड पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षीय आरोपी हा काही काम करत नाही. तर, पीडित मुलीची आई घरकाम करते. त्यामुळं त्या सकाळ पासून रात्री पर्यंत घराबाहेर असतात. तर पीडित ११ वर्षीय मुलीला ७ वर्षीय बहिण आणि ३ वर्षीय भाऊ आहे. सहा महिन्यांपूर्वी दोन्ही मुलांना बाहेर खेळायला लावून ‘तू मोठी झाली आहेस का’ हे पाहायचे आहे असे म्हणून ११ वर्षीय मुलीवर बापानेच बलात्कार केला होता. मात्र, ही बाब तुझ्या आईला सांगितलीस तर तुला ठार मारेन अशी धमकी दिली. यामुळं अल्पवयीन मुलीने अत्याचार सहन केला. 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बापाने मुलीवर बळजबरी करत पुन्हा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, मुलीने धाडस दाखवत त्याला विरोध केला. याचा राग आल्याने त्याने मुलीला बेदम मारहाण केली. दरम्यान, रात्री आई कामावरून घरी आल्यानंतर शेजारी राहणाऱ्या महिलेने मुलीला तिच्या वडिलांनी खूप मारहाण केली असून मोठमोठ्याने आवाज येत होता, अशी माहिती दिली. तेव्हा, आरोपी पतीला विचारणा केली असता त्याने वेगळंच उत्तर दिलं.

मात्र, मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता बळजबरी करत असल्याचं समोर आलं. तसेच सहा महिन्यांपूर्वी माझ्यावर बलात्कार केला असल्याचं मुलीने आईला सांगितलं. त्यानंतर होत असलेल्या अत्याचाराचं प्रकार समोर आला आहे. या घटनेप्रकरणी आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास महिला पोलीस अधिकारी संगीता गोडे करत आहेत. .

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-10-2021 at 12:39 IST

संबंधित बातम्या