पिंपरी-चिंचवडमध्ये आठ महिन्याचे थकीत घर भाडे मागण्यासाठी गेलेल्या घरमालकाच्या मुलाला टेरेस च्या चौथ्या मजल्यावरून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भाडेकरू कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत घरमालकाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सौरभ पोरे, असं जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरात तक्ररदार यांची चार मजली इमारत आहे. ते स्वतः त्या ठिकाणी राहत असून आरोपी कुटुंब देखील बऱ्याच दिवसांपासून तेथे राहत आहे. दरम्यान, आठ महिन्याचे भाडे थकल्याने दोन दिवसांपूर्वी घरमालकाचा मुलगा सौरभ आणि त्याचे वडील ते मागण्यासाठी गेले होते. तेव्हा, त्यांना भाडेकरूंनी चौथ्या मजल्यावरच्या टेरेसवर बोलावले. तिथे भाडेकरू कुटुंब आणि त्यांच्यात वाद झाले. या दरम्यान भाडेकरूने घरमालकाचा मुलगा सौरभ याला खाली ढकलून दिले आहे, असं तक्रारीत म्हटलं आहे. यात, सौरभ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा- पुणे: जातपंचायतीकडून घटस्फोट न घेतल्याने बहिष्कार; पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी घटना

घरमालकाच्या मुलाने केला होता विनयभंग?

भाडेकरू कुटुंबात १५ वर्षीय मुलगी राहात असून गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात तिचा जखमी सौरभने विनयभंग केला असल्याची तक्रार नुकतीच सांगवी पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्याच्या एक दिवसानंतर सौरभला टेरेसवरून खाली ढकलून देण्याची घटना घडली आहे. याचा परस्पर काही संबंध आहे का? याचा तपास सांगवी पोलीस करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune crime news landlord son was pushed from the fourth floor boy seriously injured filed crime srk 94 kjp
First published on: 03-09-2021 at 13:11 IST