पुणे : मतिमंद महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पर्वती पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पीडित महिलेच्या वहिनीने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३५ वर्षीय महिला मतिमंद आहे. ती शारिरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याची माहिती आरोपीला होती. मंगळवारी (१४ एप्रिल) सायंकाळी पाचच्या सुमारास आरोपीने महिलेला घरात धमकावून नेले. त्याने तिच्यावर बलात्कार केला. महिलेने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने तिला मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मिलिंद माेहिते यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.
समाज माध्यमातील ओळखीतून महिलेवर बलात्कार
समाज माध्मयात झालेल्या ओळखीतून महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी एकााविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका तरुणाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. आराेपी भोर तालुक्तातील गोगलवाडीत राहायला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ४२ वर्षीय महिलेची आरोपीशी समाज माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर त्याने महिलेला व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून मित्राच्या खोलीवर बोलावले. त्याने महिलेशी अश्लील कृत्य केले. महिलेला जाळ्यात ओढून त्याने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर महिलेची छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक जया सोनटक्के तपास करत आहेत.
