scorecardresearch

पुणे : ‘भाई’ न म्हटल्याने सराईत गुंडांची तरुणाला अमानुष मारहाण; खायला लावली जमिनीवरची बिस्कीटं

या प्रकरणात आत्तापर्यंत पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं असून मुख्य आरोपी मात्र फरार आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये एका सराईत गुन्हेगाराने ‘आपल्याला भाई का म्हटलं नाही’ या रागातून एका तरुणाला इतर सहकाऱ्यांच्या मदतीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाला जमिनीवर पडलेली बिस्किटं खायला लावत मारहाण केली आहे. रोहन उर्फ गंग्या वाघमारे असं मारहाण करणाऱ्या गुन्हेगाराचं नाव आहे. तो पुण्याच्या खडकवासला परिसरात राहतो अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं असून मुख्य आरोपी रोहन हा मात्र फरार आहे. त्याचा शोध वाकड पोलीस घेत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला भाई म्हणाला नाही या रागातून रोहन वाघमारे या सराईत गुन्हेगाराने एका तरुणाला मारहाण केली आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना थेरगाव परिसरात घडली आहे.

गंभीर बाब म्हणजे या गुंडांने जखमी तरुणाला जमिनीवर पडलेली बिस्कीटं तोंडाने खायला लावली आहेत. त्यानंतर त्याला पाच ते सहा जणांनी बेदम मारहाण केली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून पाठीवर मारहाणीचे व्रण उठले आहेत. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune crime pimpri chinchwad boy beaten badly for not calling bhai vsk 98 kjp

ताज्या बातम्या