हैद्राबादमधील परिवहन महामंडळाच्या बसमधून गांजा घेऊन येणाऱ्या तिघांना केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या पथकाने (कस्टम) सोलापूर परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५६ किलो गांजा जप्त करण्यात आला. हैद्राबादमधील गांजा महाराष्ट्रात विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती कस्टमच्या पुणे कार्यालयातील पथकाला मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : थंडी पुन्हा पळाली ; पावसाळी स्थितीचा अडथळा – आठवडाभर तापमानात वाढ

हैद्राबादमधील परिवहन महामंडळाच्या बसमधून गांजा सोलापूर परिसरात पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कस्टमचे अमली पदार्थ विरोधी पथक तेथे रवाना झाले. कस्टमच्या पथकाने बसचा पाठलाग केला. बस अडविण्यात आली. बसची तपासणी करण्यात आली. तेव्हा बसमध्ये पोत्यात ठेवण्यात आलेला ५६ किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती कस्टमच्या पुणे विभाग कार्यालयाचे उपायुक्त सचिन घागरे यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune customs seize 56 kg ganja bought from hyderabad transport corporation bus in solapur pune print news zws
First published on: 05-12-2022 at 11:03 IST