Premium

पुणे: रुपाली चाकणकर यांच्या समाजमाध्यमातील खात्यावर अश्लील मजकूर; सायबर गुन्हे शाखेकडून तीनजण ताब्यात

याप्रकरणी रुपाली चाकणकर यांचे भाऊ संतोष बबन बोराटे यांनी १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

pune cyber cell detained three for posting obscene content on rupali chakankar s social media account
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर photo credit : facebook

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या समाजमाध्यमातील खात्यावर अश्लील मजकूर लिहिल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांचे मोबाइल संच जप्त केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयंत रामचंद्र पाटील (रा. धनगरवाडी, सांगली), वसंत रमेशराव खुळे (रा. रहाटी, जि. परभणी), प्रदीप कणसे (रा. पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. पाटील, खुळे आणि कणसे यांचे मोबाइल संच जप्त करण्यात आले असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी रुपाली चाकणकर यांचे भाऊ संतोष बबन बोराटे यांनी १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

हेही वाचा >>> हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुषखबर; राज्य सरकार देणार वर्षभरात एवढी घरे

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या समाजमाध्यमातील खात्यावर विकास सावंत, जयंत पाटील, रणजीतराजे हत्तीमबिरे, अमोल पाटील अश्लील मजकूर लिहून टीका केली होती. तांत्रिक तपासात रणजीतराजे हत्तीमबिरे, अमोल पाटील नावाने खाते चालविणाऱ्या संशयिताची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. जयंत पाटील याला नोटीस बजावून जबाब नोंदविण्यात आला असून त्याच्या मोबाइल संच जप्त करण्यात आला,  तसेच वसंत खुळे, प्रदीप कणसे यांना नोटीस बजाविण्यात आली असून, त्यांचे मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> ‘मुळशी पॅटर्न’ चर्चेत! शेत जमिनीच्या वादातून मध्यप्रदेशातून आणली चार पिस्तुले

शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहल अडसूळ, विद्या साबळे, संतोष जाधव, दिनेश मरकड, सुनील सोनुने, उमा पालवे आदींनी ही कारवाई केली.

समाजमाध्यमात महिलांविषयी बदनामीकारक, तसेच अश्लील मजकूर लिहिणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. महिलांनी तक्रार देण्यास पुढे यावे. – रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune cyber cell detained three for posting obscene content on rupali chakankar s social media account pune print news rbk

First published on: 05-12-2023 at 21:59 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा