पुणे : क्रेडीट कार्ड अद्ययावत करण्याची बतावणी करुन सायबर चाेरट्यांनी डाॅक्टर तरुणीची दोन लाख नऊ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका डाॅक्टर तरुणीने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डाॅक्टर तरुणी ओैंध भागात राहायला आहे. डाॅक्टर तरुणी ओैंधमधील एका खासगी रुग्णालयात कामाला आहे. सायबर चोरट्यांनी डाॅक्टर तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मुंबईतील एका खासगी बँकेतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. क्रेडीट कार्डची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.
चोरट्यांनी तरुणीला एक लिंक पाठविली. या लिंकमध्ये बँक खात्याची गोपनीय माहिती भरण्यास सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी गोपनीय माहितीचा दुरुपयोग करुन चोरट्यांनी तरुणीच्या बँक खात्यातून दोन लाख नऊ हजार रुपये लांबविले. खात्यातून चोरट्यांच्या खात्यात रक्कम वळविण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे फिर्याद दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करत आहेत.
रखवालदाराला धमकावून चंदनाचे झाड कापून नेले
खडकीतील एका खासगी कंपनीत शिरलेल्या चोरट्यांनी रखवालदाराला धमकावून चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत रखवालदाराने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रखवालदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, चंदन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकीत किर्लोस्कर इंडस्ट्रीज कंपनी आहे. कंपनीच्या आवराात मध्यरात्री तीन ते चार चोरटे शिरले. गस्त घालणाऱ्या रखवालदाराने चोरट्यांना पाहिले. त्यांनी चोरट्यांना हटकले. तेव्हा चोरट्यंनी त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन चंदनाचे झाड कापून नेले. पोलीस उपनिरीक्षक गाडेकर तपास करत आहेत. शहर परिसरातील बंगले, सोसायटीचे आवार, शासकीय आणि शैक्षणिक संस्थेच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.
शुक्रवार पेठेत दुकानात चोरी
दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी चांदीची नाणी, रोकड, पितळी मूर्ती असा एक लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना शुक्रवार पेठेत घडली. याबाबत एका व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाचे शुक्रवार पेठेत तांबे, स्टिलची भांडी विक्री, तसेच मोड घेण्याचा व्यवसाय आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड, चांदीची नाणी, पितळी मूर्ती, भांडी असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस हवालदार हर्षल दुडम कपास करत आहेत. शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुकानांचे कुलूप तोडून ऐवज चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार
विवाहाच्या आमिषने तरुणीवर बलात्कार, तसेच तिच्याकडून २५ लाख ७६ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी वाघोली पोलिसांनी एकााविरुद्ध गुन्ह दाखल करण्यात आला. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणीने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि आराेपीची ओळख झाली होती. आरोपीने तरुणीला जाळ्यात ओढले. तिला विवाहाचे आमिष दाखविले. त्यानंतर गेल्या दहा महिन्यात आरोपीने तरुणीला वेगवेगळी कारणे सांगून तिच्या बँक खात्यातून वेळोवेळी २५ लाख ७६ हजार रुपये घेतले. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तरुणी, तसेच तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने नुकतीच पोलिसंकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक थोरात तपास करत आहेत.
