पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ८८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक मूळचे गुरुग्राममधील आहेत. ते मगरपट्टा सिटी परिसरात राहायला आहे. त्यांचा मुलगा आणि सून हे माहिती -तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहेत. हडपसरमधील ओैद्योगिक वसाहतीत छोटा कारखाना होता. करोना काळात कारखान्याची विक्री करण्यात आली. कारखाना विक्रीतून त्यांना मोठी रक्कम मिळाली.

गेल्या मोबाइल क्रमांकावर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. चोरट्यांनी सुरुवातीला त्यांच्या खात्यात काही रक्कम जमा केली. रक्कम जमा केल्यानंतर चोरट्यांनी परतावा दिल्याचे भासविले. प्रत्यक्षात त्यांना परतावा दिला नाही.

ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यात वेळोवेळी २२ कोटी तीन लाख २२ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.ज्येष्ठ नागरिकाने ज्या बँक खात्यात पैसे जमा केले. त्या बँक खात्याची पोलिसांकडून तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. सायबर चोरट्यांच्या आमिषांना बळी पडू नये. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या संदेशांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कारवाईची भीती दाखवून महिलेची फसवणूक

काळ्या पैसे व्यवहारात कारवाईची भीती दाखवून महिलेची सायबर चोरट्यांनी चार लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ४८ वर्षीय महिलेने सायबर पोलसी ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला कोंढवा भागात राहायला आहे.

सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर डिसेंबर महिन्यात संपर्क साधला होता. काळ्या पैसे व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून चोरट्यांनी महिलेला अटक टाळण्यासाटी तातडीने पैसे जमा करावे लागतील, असे सांगितले. महिलेने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.