पुणे : हडपसर भागातील हांडेवाडी परिसरात जोगवा मागणाऱ्या एकाकडे हप्ता देण्याची मागणी करणाऱ्या तिघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. मन्नत राजू ठाकूर (वय २५, रा. रामटेकडी, हडपसर) याने याबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सुषमा उर्फ भावड्या भीम विधाते (रा. ताडीवाला रस्ता), वेदांत आणि आएशा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा – पुणे : खडकवासला धरणातून पुन्हा पाणी सोडण्यास सुरुवात
तक्रारदार १५ ऑगस्ट रोजी हांडेवाडी परिसरात जोगवा मागत होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. या भागात जोगवा मागायचा असेल तर दरमहा हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी दिली. ठाकूरला धमकावून तिघांनी ताडीवाला रस्ता परिसरात नेले. त्याला धमकावून आरोपींनी त्याच्याकडून ५७ हजार रुपये घेतले. पोलिसांकडे तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.
© The Indian Express (P) Ltd